बारामतीत भयानक पाऊस झाला आहे. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बारामतीचा नीरा डावा कालवा फुटला आहे.
बारामती तालुक्यातील नीरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला आहे. कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. कालव्याचे पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले आहे. हा महामार्ग जलमय झाला आहे. खरबदारी म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा आहे. कालवा फुटून कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील ओढ्याला पूर आलेला आहे. या पुराचे पाणी सणसर गावातील अनेकांच्या घरात शिरलेल आहे. अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं यामध्ये मोठ नुकसान झालंय. सणसर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ओढा तुडुंब भरून वाहतोय तर पुणे बारामती मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालीय.