नितेश राणेंचा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले…माझ्या मुलाला…!

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना कॉल केला होता. तुम्हालाही दोन मुलं आहेत. माझ्या मुलाकडूनही चूक झाली असेल. त्याला वाचवा असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा सनसनाटी गौप्यस्फोट कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, “उद्धवजींना जर वाटत आहे की आम्ही सगळे लोक राजकीय आरोप करत आहोत, तर त्यांनी नारायण राणेंना कॉल का केला होता? आणि म्हणाले होते की, माझ्या मुलाला यातून वाचवा.” ते पुढे म्हणाले “नारायण राणे यांना उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल केला होता”.

“त्यांनी येऊन सांगावं की, नितेश राणे खोटं बोलतोय. बाकीचे सगळे खोटं बोलत आहेत. दिशा सालियनचे वडील खोटं बोलत आहेत. सांगून टाका. विषय मिटवून टाका. आम्ही माफी मागतो महाराष्ट्राची. त्यांची माफी मागू. नैतिकतेच्या आधारे आता का येऊन बोलत नाही, आदित्य ठाकरे. माझ्यावर आरोप झालाय. जोपर्यंत आरोप मिटत नाही, तोपर्यंत मी आमदार राहणार नाही, असे आदित्य ठाकरे का म्हणत नाहीत?”, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here