कॉफीबद्दल लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. काही लोकांना वाटतं कॉफी प्यायल्याने कर्करोग होतो. पण काही कप कॉफी प्यायल्याने कर्करोगाचा धोका वाढतो असे म्हणणे चुकीचे आहे.
कॉफी नाही तर कॅन्सरचा सर्वाधिक धोका हा दारूपासून आहे. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, सर्व प्रकारचे अल्कोहोल कर्करोगाचा धोका वाढवतात. जरी दारू पिणाऱ्या प्रत्येकाला कर्करोग होत नसला तरी, दारूचे सेवन कमी केल्याने कर्करोगाचा धोका कमी नक्कीच होतो. अल्कोहोलशी संबंधित धोके केवळ कर्करोगापुरते मर्यादित नसतात. जास्त मद्यपान केल्याने अपघात, उच्च रक्तदाब आणि यकृताच्या आजाराचा या सारखा धोकादायक आजारांचा धोका वाढतो.