राज्य सरकार अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा देणाऱ्या या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशी माहिती दिली.
हे अॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अॅप तयार होणार आहे असे सरनाईक म्हणाले.