‘इश्कबाज’ आणि ‘मिले जब हम तुम’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेल्या नवीना बोलेने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तिने कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. साजिद खान खूप वाईट माणूस असल्याचं नवीनाने म्हटलंय. त्याने मला त्याच्या घरी बोलावले आणि माझे कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप नवीनाने केलाय.
नवीना बोलेने सुभोजित घोषला त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत दिली. यावेळी तिने विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान याच मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा केला. साजिद खान इंडस्ट्रीतील इतर महिलांचा कसा अपमान करतो, याबद्दल ती खुलेपणाने बोलली.