विराट आणि रोहित नंतर हा खेळाडू घेणार निवृत्ती

भारताचा टेस्ट क्रिकेट संघ जून महिन्यात टेस्ट सिरीज खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करणार असून यात ते इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने या टेस्ट सीरिजपूर्वीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं एक आश्चर्यचकीत करणार विधान समोर येत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तीच्या नियोजनाविषयी खुलासा केला आहे. बुमराहने माजी खेळाडू माइकल क्लार्क यूट्यूब पॉडकास्ट शो बेयॉन्ड २३ मध्ये सांगितले की, जेव्हा त्याचं शरीर योग्यप्रकारे क्रिकेट खेळू शकणार नाही, त्यावेळी तो निवृत्तीची घोषणा करेल. बुमराहने सांगितले की कोणत्याही खेळाडूसाठी अधिक काळ क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं अवघड आहे. बुमराह पुढे म्हणाला, ‘मी हे बऱ्याच काळापासून करत आहे, पण एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला समजून घ्यावे लागेल की तुमचं शरीर कुठे जातय’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here