लाडक्या बहिणींच्या खात्यावर कोण मारतंय डल्ला?

आज जगात AI डिजिटल क्रांती होत आहे. आपण तंत्रज्ञानाने प्रगत होत आहोत ही चांगलीच गोष्ट आहे. पण तंत्रज्ञान जशी प्रगती करत आहे तसच सायबर गुन्हेगार पण प्रगती करत आहेत. हल्ली सायबर फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. सामान्य नागरिकच नाही तर सरकारी साईट सुद्धा याचे शिकार होताना दिसतायत. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना सुद्धा सायबर चोरांनी टार्गेट केलंय. एकीकडे डिजिटल क्रांती होत आहे तर दुसरीकडे फ्रॉड पण वाढले आहेत. अँटीव्हायरस कंपन्या त्यावर काम करताय. या फसवणुकीला आळा बसावा यासाठी प्रसिद्ध क्विकहील अँटी व्हायरस कंपनीने अँटी फ्रॉड डॉट AI तयार केलं आहे. याविषयी क्विकहील अँटी व्हायरस कंपनीच्या सह संचालिका स्नेहा काटकर यांचा विशेष पॉडकास्ट नक्की पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here