एकीकडे भारताने दिलेल्या करारा जवाबनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानवर बलुचिस्ताननेदेखील वेगळा देश बनवण्याची मागणी करत आहे. हीच संधी साधत बलूचिस्तान हा वेगळा देश बनवण्यासाठी बलूचांचा एक समूह संयुक्त राष्ट्राकडे पोहोचला आहे. त्यांवा वेगळ्या बलूचिस्तानचा दावा केला आहे.
पाकिस्तानपासून वेगळं होऊन बलूचिस्तान हा वेगळा देश करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर बलूचिस्तानचे राष्ट्रगान वाजत आहे. बलूचिस्तानी कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी UN ने मान्यता द्यावी, अशी अपील केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला ताबा सोडण्यासही सांगण्यात आलं आहे. बलूचिस्तानच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राकडून मान्यता देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्याची अपील केली आहे. तर, बलूचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये मागील २४ तासांत अनेक मोठे स्फोट झाले आहेत. ८ मेला पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनावरही बीएलएने हल्ला केला होता. त्यात १४ सेनिकांचा मृत्यू झाला होता.