राष्ट्रीय लोकतांत्रित पक्षाचे प्रमुख आणि नागौरमधील खासदार हनुमान बेनिवाल यांनी “ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आपली बायको झाली असून, आता सरकारने तिला घरी आणलं पाहिजे,” असं विधान केलं आहे.
सोमवारी रात्री उशिरा सभागृहाला संबोधित करताना बेनिवाल म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सरकारने पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडलं. “तुम्ही ‘सिंदूर’ हे नाव ठेवलं. भारताने पाकिस्तानच्या केसांमध्ये सिंदूर लावलं असं दिसत आहे. हिंदू श्रद्धेनुसार, एक महिला तिच्या पतीला तिचे सिंदूर मानते. भारत पाकिस्तानला सिंदूर लावतो, याचा अर्थ पाकिस्तान त्याची पत्नी बनला आहे. फक्त पाठवणी (वधूचा निरोप) उरली आहे. तुम्ही जा आणि पाकिस्तानला घरी आणा,” असे ते म्हणाले, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.