भारतानं एअरस्ट्राईक करुन उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्ताननं भारताशी दोन हात करण्याऐवजी सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रसार करणं सुरु केले आहे. खोट्या बातम्या दाखवून पाकिस्तानी लोकांची दिशाभूल केली जात आहे. हा खोटारडेपणा इतका टोकाला गेलाय की मुंबईतल्या धारावीतल्या आगीचे व्हिडिओ दाखवून तो हल्ला भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे.
खोटारडेपणाचा कळस म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या धारावीत सिलेंडर स्फोट झाले होते. एका ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे स्फोट झाले होते. तो व्हिडिओच पाकिस्तानी सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल करण्यात आले. त्या व्हिडिओत सिलेंडरचा तो ट्रक आणि स्फोट झालेले सिलिंडर स्पष्टपणे दिसतात.
भारत-पाकिस्तान तणावामुळे युद्धजन्य परिस्थितीत, सोशल मीडियावर काहीही चुकीचे पोस्ट केले जाऊ नये यासाठी भारतात यंत्रणेनं नागरिकांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे. पीआयबी फॅक्ट चेक – प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत फॅक्ट चेकिंग सोशल मीडिया हँडल एक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, पाकिस्तान प्रायोजित प्रचार असलेल्या बनावट सोशल मीडिया पोस्टविरुद्ध इशारा देण्यात आला आहे.