पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर ही तिच्या कराचीच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. हुमैरा ही ३२ वर्षांची होती आणि तिच्या अपार्टमेंटच्या मालकानं तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतर लगेच पोलिसांनी चौकशी केली. हुमैरा ही बऱ्याच काळापासून अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती. तर तिनं बऱ्याच काळापासून अपार्टमेंटचं भाडं देखील दिलं नव्हतं.
हुमैराचं पार्थीव हे सडलेल्या अवस्थेत सापडलं. ती ज्या घरात राहत होती त्या घरच्या मालकानं तिनं भाडं दिलं नाही या प्रकरणात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्याच घरातून तिचं पार्थीव सापडलं. तपास केल्यानंतर आणि स्थानिक लोकांना जेव्हा या सगळ्या घटनेविषयी कळताच त्यांना देखील आश्चर्य झालं की त्यांना याविषयी कसं कळलं नाही. अरब न्यूजनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ज्या अपार्टमेंटमध्ये ती राहत होती, त्या मजल्यावर दुसरं कोणीच राहत नव्हतं आणि बाल्कनीचा दरवाजा हा उघडा होता.
पोलिसांना विश्वास आहे की जर ९ महिन्यांआधी निधन झालं आहे. तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा शेजारी परत आले तोपर्यंत दुर्गंध पूर्णपणे गेली होती. खरंतर, तिचं निधन कधी झालं याचा गुंथा हा सुटलेला नाही. त्यावर अजून पोलीस शोध घेत आहेत. घरातील कोरडे आणि गंज लागलेल्या पाण्याचे पाइप, एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ, जे कमीत कमी सहा महिन्यांपूर्वी एक्सपायर झाल्याचं म्हटलं जातंय आणि त्यामुळे असं म्हटलं जातंय की ती बऱ्याच काळापासून याकडे कोणी लक्ष न दिल्याचं म्हटलं जातंय.