पाकिस्ताननं २८ मे रोजी ‘यौम-ए-तकबीर’ म्हणजेच त्यांच्या अणुशक्ती मिळवल्याचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. १९९८ मध्ये याच दिवशी पाकिस्तान अणूबॉम्ब बनवणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला होता. या दिवशी देशभरात मोठमोठे कार्यक्रम होतात. पण याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री हिना ख्वाजा बयात यांनी देशातील पब्लिक आणि प्रायव्हेट सर्व्हिसेसची दयनीय अवस्था जगासमोर उघड केली आहे.
हिना यांनी सोशल मीडियाव एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, देशातील सर्वात गजबजलेलं जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट (कराची) इथे असलेल्या टॉयलेटमध्ये पाणीही नाही. त्या म्हणाल्या, ‘आज यौम-ए-तकबीर आहे आणि मी कराची विमानतळावर उभी आहे. ज्या दिवशी देशाच्या प्रगतीचा अभिमान बाळगायला हवा, त्या दिवशी इथे टॉयलेटमध्ये पाणीसुद्धा नाही. लोक नमाजसाठी तयारी करतायत, पालक त्यांच्या मुलांना टॉयलेटला नेतायत, पण तिथं पाणी नाही.’