सुरेश धसांविरोधात पंकजा मुंडे आक्रमक, म्हणाल्या…पक्षश्रेष्ठींनी…

आमदार सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जाहिरपणे टिका करत आहेत. यासोबतच त्यांनी थेट काही आरोपही केली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टीत पंकजा मुंडे यांनी पक्षाचे काम केले नसून अपक्ष उमेदवाराचे काम केल्याचा आरोप हा सुरेश धसांनी केला आहे. इतकेच नाही तर पक्षाचे काम न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली होती. बीडच्या प्रश्नावर विचारले असता पंकजा मुंडे यांनी मला ते विचारू नका म्हटले होते. यावरही सुरेश धस यांनी टीका केली होती.

आता मात्र पंकजा मुंडे या सुरेश धस यांच्याबद्दल अॅक्शन मोडवर आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावा, असे म्हटले आहे. मी भाजपाची राष्ट्रीय नेता असूनही धस असे आरोप कसे करतात? असाही सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटी चाैकशीची मागणी मी पहिल्यांदा केली, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here