पनवेल-कर्जत दरम्यान २९ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी ४९१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
मुंबईतील वाढती लोकवस्ती पाहता कर्जत-पनवेल अशा शहरांकडे नागरिकांचा ओढा अधिक आहे. भविष्यातील गरजा ओळखून मध्य रेल्वेने कर्जत-पनवेल दरम्यान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर नव्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे मंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.