महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. अशातच मराठी भाषिकांच्या वादात भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी उडी मारली आहे. नुकतेच त्यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. पवन सिंह यांच्या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, पवन सिंह यांनी माझा जीव गेला तरी चालेल पण मी मराठी बोलणार नाही असं हिंदी-मराठी वादावर विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे देशात पुन्हा एकदा मराठी भाषेबाबतचा वाद निर्माण झाला आहे.
सध्या महाराष्ट्रात हिंदी-मराठी असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी वादग्रस्त विधान करून या वादात उडी मारली आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण मी कधीच मराठी बोलणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या भोजपुरी या मातृभाषेचा अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यासोबतच कधीही कोणाच्याही दबावाखाली येऊन मी मराठी कधीच बोलू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.