एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. उत्पादन शुल्कात वाढ केल्याने किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे आदेशात सांगण्यात आलेले नाही. परंतु, पीटीआयने उद्योग सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.