मी खूप स्पष्ट शब्दात सांगतो, ज्यांनी हा हल्ला केलाय. त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा होईल. शिक्षा मिळणारच. दहशतवादांच्या उरल्या सुरल्या जमिनिला संपवण्याची वेळ आलीय, असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना दिला आहे.बिहारमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा, भाऊ, जीवनसाथी गमावला. यातील कोणी आंध्र, कोणी मराठी, कोणी गुजराती तर कोणी बिहारचा लाल होता. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एकसारखं आहे, आपल्या वेदना एकसारख्या आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभरामध्ये पडदास उमटत असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.