परीक्षेचं टेन्शन आलंय? तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टिप्स फॉलो करा

परीक्षांचा काळ हा तणावयुक्त असतो. त्यात दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे सगळ्यांनाच टेन्शन. दरवर्षी परीक्षेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करतात. यंदाही त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला आणि मुलांना तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला. मुलांना येणारा ताण आणि टेन्शन लक्षात घेऊन मोदींनी 10 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहे.

यावेळी, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी ताण व्यवस्थापन आणि करिअर नियोजन विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावर्षीच्या ‘परीक्षा पे चर्चा’ साठी 3.30 कोटींहून अधिक विद्यार्थी, 20 लाख शिक्षक आणि 5.51 लाखांहून अधिक पालकांनी नोंदणी केली होती. या चर्चा सत्रात पंतप्रधान मोदी यांनी काय टिप्स दिल्या आहेत पाहुयात.

चांगली झोप आवश्यक

परीक्षेची तयारी करण्यासाठी निरोगी आणि तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे असून, यासाठी अभ्यासासोबत चांगली झोप देखील घ्या असे पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सकस आहार आवश्यक

परीक्षेची तयारी करण्यासाठी आहार देखील सकस आणि पोषक असायला हवा. त्यामुळे निरोगी आहार घेण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे. तुमचे आईवडील जे खायला देतील ते खा आणि निरोगी राहा. बाहेरच खाण्यापेक्षा सकस, पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे.

लिहिण्याची सवय महत्त्वाची

आरोगयाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना लिहिण्याचा सराव कायम ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “तुम्ही काहीही लिहा, पण लिहिण्याची सवय खूप महत्त्वाची आहे, कारण ती सवय तुमच्या विचारांना बांधून ठेवते.

आवडत्या गोष्टींना वेळ द्या

अभ्यासासोबतच आराम करणे देखील खूप महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. मुलांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी कराव्यात, छंद जोपासावे. यामुळे मन शांत राहील आणि शरीर तंदुरुस्त राहील.

पुस्तकी किडा बनू नका

पंतप्रधान मोदी म्हणाले की कधीही पुस्तकी किडा बनू नका पण ज्ञान मिळवण्यापासून कधीही मागे हटू नका. ते पुढे असे देखील म्हणाले की, माणसाने नेहमी नवनवीन गोष्टी राहिले पाहिजे.

स्वतःवर लक्ष केंद्रित करा

पंतप्रधान मोदींनी मुलांना मन शांत ठेवण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. त्यांनी मुलांना सांगितले की निरर्थक बोलण्याऐवजी त्यांनी स्वतःवर लक्ष केंद्रित करावे. जर तुम्ही इतर गोष्टींबद्दल जास्त बोललात आणि विचार केलात तर तुमचे मन विचलित होऊ शकते. यासाठी ध्यान अत्यंत महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here