गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह, नवी मुंबई, ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या टोळीला जेरबंद करण्यास अखेर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या या चड्डी-बनियन टोळीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी यात दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी टँकरचे पाणी पाजून व सापळा रचत या दोघांना अटक केली आहे.
या चड्डी-बनियन टोळीने परिसरात दहशत माजवली होती. चड्डी आणि बनियान घालून येणारे हे गुन्हेगार कुठेन येतात आणि जातात याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. पोलिसांनी या चोरांची अधिक माहिती काढली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या टोळीने भाड्याने घर घेतले होते. पण जेव्हा हे गुन्हेगार चोरी करण्यासाठी बाहेर पडायचे तेव्हा मात्र त्या ठिकाणी थेट न जाता दुसऱ्या शहरातून जायचे. अखेर पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले.