नागपूरमधील पोलिस उपयुक्ताने सांगितला त्याच्यावरील हल्ल्याचा घटनाक्रम

नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत नागरिकांसह पोलीसही गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर झोन ५ चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामुळे त्यांना खोलवर जखम झाल्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत त्यांनी आता सविस्तर माहिती दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

निकेतन कदम म्हणाले, “नागपूरचे सीपी सर यांच्या नेतृत्त्वात आणि एसआरपीएफ जवनांच्या मदतीने नागपूरची परिस्थिती हाताळली गेली. दंगल झाली त्या विभागात खूप अरुंद गल्ल्या आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांवर दगडफेक सुरू होती. त्यांच्याकडे शस्त्र, काठ्या, पेट्रोलच्या बॉटल्स होत्या. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन त्यांना मागे करण्याचा प्रयत्न करत होतो. एका संशयित हल्लेखोराला शोधण्यासाठी एक टीम एका घरात गेली. तेवढ्यात शेकडोने माणसं जमा झाली. ती टीम घरात होती, तर मी बाहेर होतो. करायचं काय? जमावाने घरावर हल्ला केला असता तर मोठी गंभीर घटना घडली असती.”

ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे काठी आणि हेल्मेट होतं, त्या बेसिसवर मी जमावाला मागे करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहीजण मागे सरकलेही. पण एकाकडे कुऱ्हाड होती, त्याने अगदी जाणीवपूर्क माझ्यावर वार केला. हा वार मी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझ्या हाताला खोलवर जखम झाली.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here