राज्यात एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार की नाही याबाबत संभ्रम असताना, दुसरीकडे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे. मनसेचं नाशिकमध्ये अधिवेशन सुरु असताना प्रकाश महाजन यांचा राजीनामा राज ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी ज्या पक्षात मान नाही सन्मान नाही तिथं थांबून उपयोग काय? अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विठ्ठल बदलणार नाही मात्र आता विठ्ठलाने बोलावल्याशिवाय जाणार नाही असे ते म्हणाले आहेत.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जाहीररित्या मनसे आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मला अधिवेशनात बोलावलं नाही असं सांगत पक्षाला माझी किंमत नाही, त्यामुळं आता पक्षात राहून उपयोग काय? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आगे. त्यामुळे आता राजकारण नको, घरी बसून शिवचरित्र वाचणार असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.