प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या डिजीटल चौकशीत पोलिसांच्या हाती तब्बल 730 व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स कुणाच्या आहेत याबाबत पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या क्लिप्स कुणाच्या आहेत याचा पोलिसांनी अतिशय गुप्तपणे तपास सुरु केल्याचंही सांगण्यात येतंय.
ड्रग्ज प्रकरणाशी संबधित व्यक्तीकडं 730 क्लिप्स आल्या कुठून आणि कशा असा प्रश्न पोलिसांच्या डोक्याला झिणझिण्या आणतोय. संबंधित व्हिडिओ क्लिप्समधील बहुतांश क्लिप या मोबाईलनं शूट केलेल्या आहेत. या शूट केलेल्या क्लिप्स कुणाच्या आहेत याची माहिती मात्र बाहेर येऊ शकलेली नाही. त्या क्लिप्सबाबत राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कोणाची तक्रार आहे का याचाही पोलीस दुस-या बाजूनं तपास करत.आहेत.