प्रतीक पाटील बब्बर आज प्रिया बॅनर्जीसोबत लग्न करणार आहे. मात्र प्रतीक बब्बरने त्याचे वडील राज बब्बर यांना लग्नाच निमंत्रण दिलेलं नाही. राज बब्बर यांचा दुसरा मुलगा आर्य बब्बरने याबाबत खुलासा केला. तो म्हणाला की, त्याला तसेच राज बब्बर यांनाही प्रतीक बब्बरच्या लग्नाला आमंत्रित करण्यात आलेलं नाही.
तो म्हणाला, ‘माझ्या आईनेच या तुटलेल्या कुटुंबाचे एका एकत्र कुटुंबात रूपांतर केलं आहे. जर तुला माझ्या आईला फोन करायचा नसेल तर तू निदान माझ्या बाबांना तरी फोन करायला हवा होतास.’ अशी खंत त्याने व्यक्त केली. दरम्यान, प्रतीकचं हे दुसरे लग्न असून यापूर्वी सान्या सागरशी लग्न झालं होतं. चाहते प्रिया आणि प्रतीकच्या लग्नाच्या फोटोजची वाट पाहत आहेत.