महाकुंभात मौनी अमावस्येमुळे प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत काहींना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. सध्या महाकुंभच्या निमित्ताने फक्त प्रयागराजमध्येच नाही तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.
लोकांना सध्या या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. अयोध्या, काशी, वाराणसी आणि इतर अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली आहे. लोक अयोध्येच्या शरयू नदीवर आणि बनारसच्या घाटावर श्रद्धेने स्नान करण्यासाठी येत आहेत.
प्रयागराजपासून अयोध्या 168 किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे संगमांमध्ये शाही स्नान करून अनेक भाविक रामनगरी अयोध्येला पोहोचत आहेत. येथे शरयू नदी आहे. ज्यांना मौनी अमावस्येला प्रयागराजला जाता येत नाही ते भाविक येथील शरयू नदीत श्रद्धेने स्नान करतत. मौनी अमावस्येच्या पहाटे तीन वाजल्यापासून लाखो भाविकांचे अयोध्येत आगमन झाले होते.
राम मंदिर ट्रस्टचे आवाहन
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी आजूबाजूच्या भाविकांना पंधरा दिवसांनीच अयोध्या मध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. चंपत राय म्हणाले की महा कुंभ आणि मौनी अमावस्येमुळे प्रयागराज येथूनही मोठ्या संख्येने भाविक येत आहे. प्रयागराजहून रेल्वे आणि रस्त्याने भाविक अयोध्येत येत आहेत. गेल्या चार दिवसात अयोध्येला भेट देणाऱ्यांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे.
अयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता मोठ्या संख्येने भाविकांना एका दिवसात राम लल्लाचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजूबाजूच्या भाविकांनी 15 दिवस कोणीही अयोध्येत येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना रामलल्लाचे सहज दर्शन घेता येईल.
महाकुंभ में आये श्रद्धालु बड़ी संख्या में अयोध्या पहुंच रहे हैं। उनकी संख्या में अभूतपूर्व वृद्धि को देखते हुए पास-पड़ोस के भक्तजनों से मेरा विनम्र निवेदन है कि यदि आप 15-20 दिन के बाद दर्शन हेतु पधारेंगे तो बहुत दूर से आने वाले भक्त आसानी से रामलला के दर्शन कर पाएंगे। pic.twitter.com/wb0MiFq5hF
— Champat Rai (@ChampatRaiVHP) January 28, 2025