प्री-एक्लेम्पसिया म्हणजे गरोदरपणातील ‘सायलेंट किलर’; जाणून घ्या माहिती

संपूर्ण जगभरात २२ मे हा दिवस प्री-एक्लेम्पसिया दिन म्हणून ओळखला जातो. गरोदरपणादरम्यान महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि तत्सम स्थिती अर्थात प्री-एक्लेम्पसियाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्याच्या हेतूनं हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

प्री-एक्लेम्पसिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळं साधारण पाच ते आठ महिला त्याचा सामना करतात. या स्थितीमध्ये लक्षणं अतिशय सौम्य असल्या कारणानं अनेकदा ती लक्षातही येत नाही. सहसा गरोदरपणादरम्यान २० आठवड्यांनंतर जर गर्भधारणा झालल्या महिलेचा रक्तदाब अर्था ब्लड प्रेशर १४०/९० पेक्षा वाढत असेल, शरीराला सूजयेत असेल आणि युरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असेल तर ही शारीरिक स्थिती प्री-एक्लेम्पसियाकडे खुणावते.

प्री-एक्लेम्पसियाची करणे म्हणजे प्लेसेंटमध्ये होणारी अस्थिरता यामागचं मुख्य कारण असून, पहिली गर्भधारणा, हायपरटेंशन, मधुमेह, थायरॉईड, ट्विन किंवा मोलर प्रेगनेन्सी, स्थुलता अशा कारणांचा समावेश आहे.

अनेक महिलांमध्ये प्री-एक्लेम्पसियाची लक्षणंच दिसत नाहीत. मात्र चाचण्यांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येतो. प्री-एक्लेम्पसियाच्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, धुरकट दिसणं, हातपाय सुजणं, पोटाच्या वरील भागात वेदना, मळमळ, उलटी, महिन्याभरात ४ किलोहून अधिक वजन कमी होणं, फेसाळ लघ्वी होणं अशी लक्षणं आढळतात. तर, गंभीर प्रकरणांमध्ये भोवळ येण्याचंही लक्षण आढळतं, जिथं ही स्थिती रुग्णाला कोमातही पाठवू शकते.

अनियंत्रित रक्तदाबामुळं ब्रेन स्ट्रोक, झटके योणं, रक्तस्त्राव वाढणं, हृदयविकार, किडनी निकामी होणं अशा गंभीर समस्या उदभवतात. एखाद्या व्यक्तीला प्री-एक्लेम्पसियामुळं फिट आल्यास गर्भवती मातांना गर्भपात, गर्भातच बाळाचा मृत्यू, आययुजीआर म्हणजे अंतर्गर्भाशयी विकास मंदता, प्रिमॅच्योर डिलीव्हरी अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

प्री-एक्लेम्पसियावरी उपाय म्हणजे सातत्यानं रक्तदाब तपासत राहण्यापासूनच प्री-एक्लेम्पसियाच्या उपायांची सुरुवात होते. जीवनशैलीमध्ये बदल, नियमित व्यायाम, योगसाधना, कमी ताण घेणं अशा सवयी इथं फायद्याच्या ठरतात. शिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ, साखर, मीठ, तेलकट पदार्थ यांचं सेवन कमी केल्यास त्यामुळंही सकारात्मक फायदा दिसतो. अनेकदा डॉक्टरांटच्या सल्ल्यानं प्री-एक्लेम्पसिया असणाऱ्यांना रक्तदाब नियंत्रणात आणणारी औषधंसुद्धा दिली जातात. गर्भवती महिलांमध्ये या स्थितीत ३७ आठवड्यांपर्यंत गर्भधारणा सुरक्षित असते. जिथं कोणताही धोका नसल्यास प्रसूती केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here