ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचच लक्ष वेधलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानं ते राजकारणात पुन्हा एकदा नवा प्रवाह जोडण्याचे संकेत देत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. ज्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी एकञ येण्यासंबंधीचं पवारांचं विधान का केलं हे मला माहित नाही पण यातून त्यांच्या सहकाऱ्यांची सत्ते साठीची हतबलता दिसते, असं म्हटलं आहे.
समजा पवार तिकडे गेलेच तर त्याचा मविआवर फारसा परिणाम होणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस सक्षमपणे निभावेल, असंही चव्हाण म्हणालेत. पण पवारांचं आजवरचं राजकारण हे जातीयवाद पक्षांविरोधात राहिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे सगळंच बदलून जाईल असंही मत त्यांनी व्यक्त केलं.