नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनींने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याचं आहे. पोलिसांनी प्रवीण रमेश घोलपला अटक केली आहे. नाशिकमध्ये एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये पीडिता मागील ९ महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. या काळात प्राचार्य प्रवीण घोलपने वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला, तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला, असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
घटना घडली त्यावेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीणींबरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजतात तिने भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून ४० वर्षीय संशयित प्रवीण घोलपला अटक केली.