सायको किलरला विकृत खूनप्रकरणी अटक

भीलवाडा शहरातील अयप्पा मंदिरातील एका ज्येष्ठ वॉचमनची नृशंस हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं जेव्हा आरोपी दीपक नायरच्या घरी आणखी दोन मृतेद सापडले. या दोन्ही मृतदेहांची अतिशय भयावह स्थिती होती. वॉचमनसोबत जसा प्रकार घडला अगदी तसाच प्रकार या दोन मृतदेहांसोबत घडल्याच समोर आलं आहे. या दोन्ही शवांची स्थिती अतिशय खराब आहे. दोघांचेही मुंडक आणि प्रायव्हेट पार्ट कापण्यात आले. पोलीस या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडत आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा 2.30 वाजताच्या सुमारास सुभाष नगर पोलिस स्टेशन परिसरातील अय्यप्पा मंदिरात एका वृद्ध व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मृताचे नाव ५५ वर्षीय वॉचमन लाल सिंग रावण असे आहे. रक्ताने माखलेला मृतदेह मंदिराच्या एका कोपऱ्यात पडला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर आरोपीची ओळख पटल्याची माहिती डीएसपी श्याम सुंदर बिश्नोई यांनी दिली. आरोपीचे नाव दीपक नायर आहे, तो प्रताप नगर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. यानंतर पोलिसांनी त्याला तासाभरात ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नायर हा एक सवयीचा गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मानसिक आजारी (सायको) असू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी त्याच्या घरी नेले तेव्हा तिथे आणखी दोन मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. आता पोलीस या हत्येमागील हेतू काय होता आणि हे मानसिक विकाराचे प्रकरण आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तिन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने, पोलिस त्यांना घटनांची मालिका मानत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here