स्वारगेट बलात्कार आरोपी नाट्यमयरित्या पोलिसांच्या ताब्यात

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुुनाट गावातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास  26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती.  पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. 

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून तो गुनाटमध्ये होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे.  गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे. गावाच्या एका भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे. झोन 2, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं असल्याचंही निखिल पिंगळे म्हणाले.

पाणी मागण्यासाठी गेला अन् सरेंडर व्हायचंय म्हणाला

शिरूर तालुक्यातील गुणाट या गावांमध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. Dog squad च्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. दत्तात्राय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी तोफ पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता. पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला आहे, असं दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे.  मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असा बोलून परत निघून गेला होता. 

दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. गाडे याला पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या संदर्भात पुढील तपास त्यांच्याकडून करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here