
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत भेटीवर येणार आहेत. पुतिन यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मॉस्को दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले की, “पुतिन यांच्या भारतभेटीच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरीही त्यांच्या भारत भेटीची तयारी सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय सरकार प्रमुखांकडून भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे,” लावरोव्ह म्हणाले. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रशियाची निवड केली होती. हे लक्षात घेऊन लावरोव्ह म्हणाले, “आता आपली पाळी आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर युक्रेन युद्ध तसेच भू-राजकीय उलथापालथीवर दोन्ही नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. युक्रेन संघर्षावर भारताने तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे, जरी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना वारंवार सांगितले आहे की हा युद्धाचा काळ नाही. संयुक्त राष्ट्रांनी रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावांनाही भारताने अनुपस्थित राहून पुतिन यांची सार्वजनिक टीका करण्याचे टाळले आहे.