राहुल कनाल यांनी कुणाल कामराला धमकी दिली आहे. ‘कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा त्याचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु’, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. “कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असलं तरी जेव्हा मुंबई येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे. घाबरण्याचं कारण नाही, कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला समोरं जावं”, राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला दोनवेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. पण अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. राहुल कनाल यांनी काय म्हटलं की, “कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं”.