पावसाने १०७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. पुणे आणि साताऱ्या जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खबरदारी म्हणून NDRF चे पथक देखील दाखल झाले आहे. मुंबईतही तर पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावासने १०७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

मागील चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली आहे.

पुणे जिल्ह्यात पावसानं थैमान घातले आहे. पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर, बारामती, दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत झालेल्या पावसाने १०७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. मे महिन्यात मुंबईत १०७ वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडला आहे. ज्याने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केलाय. १६ दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय. ११ जूनला दाखल होणारा मान्सून यंदा २६ मे रोजी दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी २७ मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here