काही दिवसांपूर्वीच समंथाने राज निदीमोरुसोबत विमानामधील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये समंथा बाजूच्या सीटवर बसलेल्या राजच्या खांद्यावर प्रेमाने डोकं ठेऊन बसली आहे. हा सेल्फी समंथानेच क्लिक केला होता. या फोटोनंतर राज आणि समंथाच्या कथित अफेरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. यापूर्वी काही वेळा अशा चर्चा झाल्या आहेत. मात्र नेहमीच राजची पत्नी याबद्दल गप्प राहिल्याचं दिसून आलं. मात्र आता राजची पत्नी शामलीने समंथा आणि राजच्या या विमानातील फोटोची चर्चा सुरु असतानाच एक सूचक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून केली आहे.
“माझ्याबद्दल जे कोणी विचार करत आहेत ज्यांच्यासाठी मी अनेक आशीर्वाद आणि प्रेम पाठवतेय. जे मला पाहत आहेत, जे मला ऐकून घेत आहेत, जे माझ्याबद्दल ऐकत आहेत, जे माझ्याशी बोलत आहेत. जे मला समजून घेत आहेत. जे मला वाचण्याचा प्रयत्न करत आहेत जे मला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे मला आज भेटले आहेत, त्या सर्वांनाच माझे आशीर्वाद आणि प्रेम!” असं शामलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
समंथा आणि राजचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आता यावर राजच्या पत्नीने सूचक विधान केल्यानंतर खरोखरच राज आणि समंथाचं काही सुरु आहे का याबद्दलची चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे, हे मात्र नक्की!