खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. “मी असं म्हणत नाही की शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढत आहे. पण एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासकरुन मुंबई महापालिका निवडणूक लढावी यासाठी लोकांचा दबाव आहे. 5 जुलैला वरळीत विजयी रॅलीत ते चित्र दिसलं आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीत गरज नाही. स्थानिक मुद्दे असल्याने स्थानिाकांवर सोडावं लागेल. मुंबईला वाचवायचं असेल तर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना एकत्र येऊन निवडणूक लढावी लागेल ही लोकांची मानसिकता आणि दबाव आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याबद्दल दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंची काम करण्याची एक पद्धत आहे. आम्ही जाहीर बोलतो, ते बोलत नसतील. पण येणाऱ्या काळात काय होत आहे हे कळेल”.