मातोश्रीवर चाललो आहे! राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी

आज राज ठाकरे शिवतीर्थाहून बाहेर पडले आणि गाडीत बसून कुठेतरी चालले होते. यावेळी पत्रकारांनी नेहमीप्रमाणे त्यांना अनेक प्रश्न विचारले. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? तुम्ही टाळी देणार का? मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न त्यांना एकाचवेळी विचारले गेले. त्यात एक प्रश्न तुम्ही कुठे चाललात? हादेखील होतो. दरम्यान राज ठाकरेंनी गाडीची काच खाली करुन पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

‘मातोश्रीवर चाललोय’ अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर तात्काळ घरगुती कामासाठी बहिणीकडे चाललोय, असे ते पुढे म्हणाले. राज ठाकरेंचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणा साऱ्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे ‘मातोश्रीवर चाललोय’ असे म्हणून फिरकी आपली फिरकी घेतली गेलीय, हे कळायला पत्रकारांना फारसा वेळ लागला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here