वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्राला अखेर अटक झाली. पोलिसांनी त्या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले. यावेळी त्या दोघांना २८ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटकेनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना पोलीस ठाण्यातून मागच्या दारानं कोर्टात नेण्यात आले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी नराधम हगवणे पिता-पुत्रावर टोमॅटो फेकत त्यांचा निषेध केला. न्यायदंडाधिकारी एन एस बारी कोर्टात दोघांची सुनावणी झाली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्ट आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांनी ७ पेक्षा अधिक दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. या गुन्ह्याचा एकत्रित तपास पोलिसांना करायचा आहे. या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे याचाही तापस केला जाणार आहे. राजेंद्र हगवणे पळून गेल्यानंतर जी वाहनं त्यांनी वापरली ती पोलिसांना रिकव्हर करायची आहेत. या मुद्द्यांच्या आधारे पोलीस युक्तिवाद करण्यात आला. आरोपी पिता पुत्राला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.