हक्कभंगाची नोटीस आणणार, रामदास कदम यांचा अनिल कदम यांना इशारा

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपावर आता रामदास कदम यांनी पलटवार केला आहे. तसेच, अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये, मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, असे आव्हान रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलं आहे. मी राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहिम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे, असेही अनिल परब यांनी म्हटले.

त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे आरोप करण्यात आले आहेत. सभागृहाने हे पटलावर ठेवायला नको, नियमबाह्य काम करुन हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे, अनिल परब यांच्यावर उद्या हक्क भंग होणार आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने हक्कभंग टाकू शकलो नाही, असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here