अनेक बॉलिवूड अभिनेते नव्या सिनेमांसह पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाले आहेत. त्यात रणवीर सिंगचाही समावेश आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सध्या जलद गतीने सुरू असून, या चित्रपटात अनेक नामांकित कलाकार एकत्र दिसणार आहेत. चित्रीकरणादरम्यान रणवीरचा लूक लीक झाला आहे. चाहत्यांनी त्याला शूटिंग सेटवर पाहताच फोटो-व्हिडीओ काढायला सुरुवात केली आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
तो सध्या ‘धुरंधर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लांब केस आणि वाढलेली दाढी असलेला त्याचा लूक प्रेक्षकांना चकित करत आहे. शूटिंगच्या वेळी चाहत्यांनी त्याला वेढा घातला आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. रणवीरने चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली. अखेरीस, त्याचे बॉडीगार्ड त्याला गर्दीतून सुरक्षित बाहेर घेऊन गेले.