नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेची बाजू मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला.
याबाबत तक्रार करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आपल्यासह आपल्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेनं केला. त्या 2 पोलीस अधिका-यांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात असा आरोपही पीडितेनं केला.