डोंबिवलीात एका रिक्षा चालकाने गतीमंद महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
फैजान खान असे अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे. फैजान हा 21 वर्षांचा आहे. त्याने 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला आहे. टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपी फैजान खानला बेड्या ठोकल्या.
ही गतिमंद महिला आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी सोनार पाडा येथून रिक्षामध्ये बसली होती. आरोपी फैजल खान यांनी गतिमंद असल्याचा फायदा घेत पीडित महिलेला निश्चित स्थळी न घेऊन जाता आरोपी खान याने या महिलेला मुंब्रा येथे अज्ञात स्थळी नेले. येथे आरोपीने तिच्यावरती अमानुष अत्याचार केला आहे.
पीडितेने दुसऱ्या दिवशी सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी फैजल खान याला अटक केली. आरोपीला कल्याणच्या न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे याप्रकरणी टिळक नगर पोलीस घटनास्थळी जाऊन या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.