भाजपमुळे काँग्रेसला सोडलं, संजय राऊतांच्या दाव्यावर धंगेकर म्हणाले…

कसबा पेठ येथील भूखंडावरून भाजपाकडून त्रास होतोय, मात्र त्या कारणामुळे मी काँग्रेस सोडली नाही”, अशा शब्दांत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच धंगेकर पुढे म्हणाले, “संजय राऊत माझ्यासाठी बोलले असतील किंवा त्यांनी माझी बाजू मांडली असेल.”

रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. “भाजपाच्या त्रासामुळेच धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले”, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर धंगेकर यांनी भाष्य केलं आहे. धंगेकर म्हणाले, “भाजपाच्या त्रासाला मी शून्य टक्के देखील घाबरत नाही.”

माजी आमदार धंगेकर म्हणाले, “कसबा पेठेतील ती जागा मी घेतली असती तर मुस्लीम समुदायाला दुःख झालं असतं. परंतु, इथे दुःख भाजप नेत्यांना होतंय. म्हणून ते वक्फ बोर्डाला पुढे करत आहेत. मात्र त्या वक्फ बोर्डाच्या प्रक्रियेत स्थगिती मिळाली आहे. आम्ही ते प्रकरण उच्च न्यायालयात नेल्यानंतर तिथे आम्हाला स्थगिती मिळाली.आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवली होती. मी भाजपाच्या त्रासाला शून्य टक्के देखील घाबरत नाही. तो विषय सात-आठ महिन्यांपासून चालू आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here