RBI कडून रेपो दरात कपात! कर्ज स्वस्त होणार!

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने ९ एप्रिल रोजीच्या धोरण आढाव्यात रेपो दर २५ बेसिस पॉइंट्स (bps) ने कमी करून ६ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीने घेतलेल्या निर्णयांची माध्यमांना माहिती दिली.यामुळे येत्या काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. दर निश्चित करणाऱ्या पॅनेलने चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थवरून अनुकूल अशी केल्याने रेपो दरात कपात करण्यात आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर लादल्याने जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनिश्चितता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहा सदस्यीय एमपीसीने हा निर्णय घेतला. उच्च कर दरांमुळे महागाई, व्यापार तणाव वाढण्याची आणि जागतिक अर्थव्यवस्थेत घट होण्याची भीती असल्याने दर कपात करण्यात आली आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. आर्थिक वर्ष २०२६ ची सुरुवात चिंताजनक झाली आहे आणि काही जागतिक व्यापार संघर्ष प्रत्यक्षात येत आहेत”, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केली. फेब्रुवारीच्या चलनविषयक धोरणात, एमपीसीने जवळजवळ पाच वर्षांत प्रथमच रेपो दर २५ बेसिस पॉइंटने कमी करून ६.२५ टक्के केला होता. महागाई कमी होत असताना आणि मंदावलेल्या वाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here