फायनल पूर्वीच आरसीबीला आनंदाची बातमी!

आज आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स असा आयपीएलचा फायनल सामना होणार आहे. मात्र आरसीबीचा स्टार फलंदाज फिल सॉल्ट हा फायनल सामन्यापूर्वी मैदानात सुरु असलेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये दिसला नाही. रिपोर्ट्सनुसार फिल सॉल्टच्या पत्नीने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे फायनलपूर्वी आरसीबीला आनंदाची बातमी मिळाली आहे.

पत्नीने बाळाला जन्म दिल्यामुळे फिल सॉल्ट हा फायनलपूर्वी आरसीबीच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये दिसला नाही. अशातच प्रश्न विचारला जात आहे की आयपीएल सोडून फिल सॉल्ट मायदेशी परतला आहे की संध्याकाळी सामन्याच्यावेळी मैदानात येऊन तो सर्वांना सरप्राईज देईल. जर तो आजच्या सामन्यात सहभागी झाला आणि संघ चॅम्पियन ठरला तर आरसीबीसाठी आनंद द्विगुणित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here