उन्हाळ्यात अनेक आरोग्याच्या समस्या डोकं वर करतात. यामध्ये सर्वाधिक जास्त त्रास हा युरिक ऍसिडचा होतो. यामध्ये हाय युरिक ऍसिडही एक सर्वात मोठी समस्या होते. युरिक ऍसिड हा शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. मात्र याचा त्रास ही तितकाच होतो. यामुळे हाता-पायांना सूज, सांधेदुखी आणि गाऊट सारख्या समस्या डोकं वर काढतात.
उन्हाळ्यात शरीरातील शरीरात पाण्याची कमतरता ही खूप सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही डिहायड्रेटेड असता तेव्हा तुमचे मूत्रपिंड पाणी साठवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे लघवी जाड होते. अशा परिस्थितीत, युरिक अॅसिड व्यवस्थित धुता येत नाही आणि रक्तात जमा होऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय करा.
जास्त पाणी प्या.
शरीरातून युरिक अॅसिड काढून टाकण्यासाठी, पुरेसे पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. हे शरीरातून युरिक अॅसिड काढून टाकण्यास मदत करेल.
प्युरिनयुक्त पदार्थ टाळा
मांस, मासे, अल्कोहोल आणि तळलेले पदार्थ यासारखे जास्त प्युरीन असलेले पदार्थ टाळा. या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.
फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवा
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन वाढवा. लिंबू, द्राक्षे, सफरचंद आणि काकडी युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
व्यायाम करा
योगा किंवा पोहणे यासारख्या नियमित हलक्या व्यायामामुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे शरीरातील अतिरिक्त यूरिक अॅसिड काढून टाकते.