रोहित शर्मा आणि विराट कोहली A ग्रेड श्रेणीत कायम

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या करारासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ग्रेड ए श्रेणीत कायम राहतील अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे.

“विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचा ग्रेड ए करार सुरूच राहील. ते अजूनही भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहेत आणि त्यांना ग्रेड ए च्या सर्व सुविधा मिळतील,” असे देवजित सैकिया यांनी एएनआयला सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here