मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चक्क मराठीत बोलतोय. रोहित शर्मा या व्हीडिओमध्ये कॅमेरामॅनकडून आधी कॅमेरा घेतो आणि नंतर एक समोर एक फोटो काढण्याच्या तयारीत तो असतो. तितक्यात बाजूला एक जण असतो त्याला रोहित मराठीत म्हणतो, “अरे तुझाच वेट करतोय तू पण जा तिकडे हा खतरनाक ग्रुप आहे तिथे… आशिष नेहरा, सत्यजीत परब, पार्थिव पटेल, विक्रम सोलंकी… जा तिकडे, जा तर तिकडे मला एक फोटो काढायचा आहे…” तितक्यात समोरचा एक जण म्हणतो “आपण सेल्फी घेऊया…” तितक्यात रोहित म्हणाला… “मी येतो तू जा तर तिथे….” यानंतर कॅमेरामध्ये स्वत: रोहित शर्मा फोटो काढतो.
रोहित शर्माने ज्यांची व्हीडिओमध्ये नाव घेतली ते सर्व गुजरात टायटन्स संघाचा कोचिंग स्टाफचा भाग होते. यानंतर फोटो काढून झाल्यावर रोहित त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, “मी सांगत होतो की हा एक खतरनाक ग्रुप आहे आणि मला याचा एक फोटो क्लिक करायचा आहे.” त्या सर्वांना रोहित जाऊन भेटतो आणि सर्व जण त्याला हात मिळवत त्याची भेट घेतात.