रशियामध्ये प्रवासी विमान कोसळले!

रशियामध्ये AN-24 ट्विन टर्बोप्रॉप प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह सुमारे 50 लोक होते. ही दुर्घटना चीन सीमेजवळील अमूर प्रदेशात घडली.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान ब्लागोवेश्चेन्स्क ते टिंडा या सुमारे 570 किलोमीटर अंतरावर उड्डाण करत होते. विमानात सहा क्रू मेंबर्ससह सुमारे 50 लोक होते. यादरम्यान त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

आपत्कालीन सेवांनी सांगितले की विमान त्याच्या गंतव्यस्थानाच्या काही किलोमीटर आधी रडारवरून गायब झाले. शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. हा परिसर प्रामुख्याने बोरियल जंगलाने वेढलेला आहे, ज्यामुळे बचाव कार्य कठीण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here