छत्रपती संभाजीनगरमध्ये हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील प्रसिद्ध व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 20 हजारांची रक्कम उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी (दि. 28 ) अटक केली. या प्रकरणात एका महिलेचा सहभाग असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुलमंडी परिसरात ही घटना घडली.
सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी हे भावसिंगपुरा परिसरात राहणारे आहेत. सिटी चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.