मनसे आणि उबाठा शिवसेना गटाच्या नेत्यांची भेट! नेमकी काय चर्चा?

मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र मोर्चा काढणार आहे. दोन्ही पक्षांनी आपण जाहीर केलेल्या तारखांमध्ये बदल केला असून, आता ५ जुलैला हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदीसक्तीवरुन सत्ताधाऱ्यांविरुद्ध विविध पक्ष, संघटना एकत्र येणार आहेत. या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर असतील. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची दादरच्या हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही भेट झाल्याचे समजले आहे.

मराठी माणसासाठी सर्व एकत्र येतायत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अशी घटना पहिल्यांदाच घडतेय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here