रिपब्लिकन पार्टी ते बोलबच्चन राऊतांनी घेतला भाजपचा समाचार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेतला आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी अमित शाहांच्या ‘एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना आहे,’ या विधानावरुन खोचक भाष्य केलं. तसेच राऊत यांना बोलबच्चन म्हणणाऱ्या फडणवीसांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे.

“एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहांपेक्षा आम्हाला जास्त आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना म्हणणं म्हणजे अमेरिका जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवले यांचा आहे असं म्हणण्यासारखा आहे. अमेरिकेत रिपब्लिकन पार्टी आहे. ट्रम्प त्याच पक्षाचे आहेत तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले किंवा त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष! अमित शहा यांच्याकडे फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही” असं राऊत म्हणाले.

“बोलबच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदींपासून घेतलीये. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. “त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते. त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील. स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन. त्यांना अजून जमत नाही आणि आता नरेंद्र मोदी हे उघडे पडायला लागले आहेत. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here